वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातून तीन जण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 14 October 2024


सातारा : सातारा शहरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहर परिसरातून तीन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सागर लक्ष्मण खवले रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा हे राहत्या घरातून मी बाहेर जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदिवे करीत आहेत. 

दुसऱ्या घटनेत, संभाजीनगर, कोडोली येथून एक वीस वर्षीय युवती घरामधून देवी पाहण्यासाठी जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक गुरव करीत आहेत. तिसऱ्या घटनेत, शाहूपुरी परिसरातून एक 27 वर्षीय महिला राहत्या घरातून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदिवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण, विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
पुढील बातमी
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी

संबंधित बातम्या