राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर सतत पचनाच्या समस्या उद्भवणे, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे, उन्हाळी लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर बऱ्याचदा शरीरातील पाणी पाण्याची कमी होऊन जाते. शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. पाणी कमी झाल्यानंतर सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या उन्हाळे लागणे. उन्हाळी लागल्यानंतर वारंवार लघवी होणे, लघवी करताना सतत जळजळ आग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. याशिवाय त्वचेवर रॅश येणे किंवा मूत्रमार्गातील इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. मूत्रमार्गात इन्फेक्शन किंवा शरीरातील उष्णतेच्या असंतुलनामुळे महिलांसह पुरुषांसुद्धा या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळी लागल्यानंतर कोणत्या बियांच्या पाण्याचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळेल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बिया आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत.
खडीसाखर आणि बडीशेप:
जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. उन्हाळी लागल्यानंतर वारंवार लघवी करताना आग किंवा जळजळ होत असल्यास बडीशेप आणि खडीसाखरेच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी तयार करताना रात्री झोपताना बडीशेप आणि खडीसाखर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून किंवा जास्त त्रास होत असल्यास तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.
थंड पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन:
उन्हाळा वाढल्यानंतर थंड पदार्थ खावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल. यासाठी आहारात कलिंगड, संत्री,टरबूज, संत्री, द्राक्षं, काकडी, नारळपाणी, लिंबू सरबत, ताक, आणि सातूचे सरबत इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पेयांचे आणि पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर थंड राहते आणि लघवीसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे सेवन जास्त करावे. याशिवाय आहारात तेलकट, तिखट आणि गरम पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. उष्ण आणि गरम पदार्थांचे सेवन केल्यामुळे लघवीमध्ये वारंवार आग आणि जळजळ होऊ लागते. यामुळे उन्हाळ्यात उष्ण पदार्थांचे सेवन करू नये.