सातारा : खंडणीप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 ते 11 दरम्यान मनोज दिलीप पवार रा. खेड, ता. सातारा यांना घराचे बांधकाम करायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी जयवंत शिवदास कांबळे उर्फ जे.के. रा. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.