पवनचक्कीमधील तांब्याच्या तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 07 December 2024


सातारा : पवनचक्कीमधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिखली, पो. ठोसेघर, ता. सातारा येथे  सुझलॉन कंपनीच्या पवनचक्की टॉवरवरील 47 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार अज्ञातांनी चोरुन नेली. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली आहे. याबाबत सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लि. चे सुरक्षा अधिकारी दीपक घाडगे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार कर्णे तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लग्नास नकार दिल्याने मुलीसह तिच्या घरच्यांना मारहाण
पुढील बातमी
पाडळी येथे मोबाईलची चोरी

संबंधित बातम्या