चिरतारुण्य ‍टिकवण्यासाठी उपाय

by Team Satara Today | published on : 06 October 2025


व्हिटॅमिन डी : व्हिटॅमिन डी शरीरासाठी आवश्यक असतं आणि हे आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते. जमल्यास सकाळी कोवळ्या उन्हात बसावे. दररोज असे करणे शक्य नसल्यास जमेल तेव्हा करावे. असे केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होणार नाही.

मसाज : शरीरामध्ये रक्त विसरण चांगले होण्यासाठी आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा तरी स्पा किंवा मसाज करावी, असे केल्यास रक्त विसरण चांगले होईल आणि तणाव कमी होण्यास मदत मिळेल.

दीर्घ श्वासोच्छ्वास :

दर रोज सकाळी प्राणायाम करावे जेणे करून आपले फुफ्फुस चांगल्यारीत्या कार्य करतील, ताण दूर होईल. श्वसन तंत्र चांगले काम करतील. हृदय स्वस्थ राहील.

मेडिटेशन :

मेडिटेशन करून आपण शरीरास तेजवान आणि निरोगी ठेऊ शकतो. मेडिटेशन कामाच्या ताणाला कमी करते.

आहारात प्रथिने :

नियमाने व्यायाम करत असल्यास आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे. जेवणात प्रथिनांचा समावेश करावा. दूध, बदाम, चणे खावे. व्यायामानंतर चणे खावेत. ह्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात,  जे शरीरासाठी फायदेशीर आहे.

डोळ्यांना विश्रांती :

आजचे युग कॉम्पुटरचे आहे. दिवस रात्र कॉम्पुटर आणि लॅपटॉप वरूनच सर्व कामे केली जातात. त्यामुळे कॉम्प्युटर स्क्रीन पासून निघणाऱ्या किरणांमुळे डोळ्याला इजा होऊ शकते. त्यासाठी डोळ्यांना आराम द्यावा. २-३ मिनिटे डोळे बंद करून बसा. असे केल्यास डोळ्याचा ताण कमी होईल. अधून मधून डोळे थंड पाण्याने धुवावे.

धावणे :

आजच्या धावपळीच्या जगात जो बघा तो धावत आहे. पण हे असं धावणे शरीरावर वेगळा प्रभाव टाकते. काही जण शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतात, जॉगिंगला जातात. पण काही कारणास्तव वेळ मिळत नसल्यास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतःच्या जागेवरच धावावे. धावल्याने रक्त विसरण चांगले होते आणि शरीर निरोगी राहते. स्वस्थ राहा, मस्त राहा.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुर्गामाता सहस्त्र चंडीयाग सोहळ्यात 1000 कुमारिकांचे पूजन संपन्न
पुढील बातमी
जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये भीषण आग

संबंधित बातम्या