सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयवंत शिवदास कांबळे रा. गुरुवार पेठ, सातारा याला सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो कोणत्याही परवानगीशिवाय दि. 23 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मल्हार पेठ, सातारा येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.