हॉटेलच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 06 February 2025


सातारा : हॉटेलच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान प्राईड हॉटेलच्या पार्किंग मध्ये लावलेली केतन ज्ञानदेव निकम रा. मिलिटरी अपशिंगे, ता. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीएफ 6885 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊस तोडीच्या आमिषाने सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक
पुढील बातमी
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अनंतचे उत्तुंग यश

संबंधित बातम्या