सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाहनाचा कट का मारला, या कारणातून चिडून जावून मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी धनराज विनोद घोडके (वय 20, रा. गडकरआळी, सातारा) या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 8 ऑक्टोबर रोजी घडली आहे.