सातारा पालिकेकडून शहरातील सहा गाळे सील

21लाख 97 हजार रुपयांची थकबाकी वसुली विभाग पुन्हा ऍक्शन मोडवर

by Team Satara Today | published on : 28 January 2025


सातारा : विक्रमी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सातारा पालिकेचा वसुली विभाग पुरता ऍक्शन मोडवर आला आहे. मंगळवारी वसुली विभागाच्या पथकाने रविवार पेठ व परिसरातील तब्बल सहा गाळे सील केले. यावेळी वॉरंट अधिकारी अतुल दिसले, वरिष्ठ लिपिक गणेश तालीम, अक्षय कोळपे, मुकेश वायदंडे, विजय पवार उपस्थित होते. ही कारवाई मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कर अधिकारी उमेश महादर, लिपिक राजाराम लगड, मिलिंद सहस्त्रबुद्धे, जगदीश मुळे, उत्तम कोळी, तुषार माहुलकर, तेजस साखरे, रवी भाग्यवंत, गणेश पवार, भारत चौधरी, पियुष यादव यांची पथके सध्या सातारा शहरांमध्ये सक्रिय झाली आहेत. रविवार पेठ, शाहू क्रीडा संकुल बाहेरील चार गाळे सील करण्यात आले. या गाळ्यांची बारा लाख दहा हजार सहाशे पाच रुपये इतकी थकबाकी आहे.

सदर बाजार परिसरातील प्रमोद चक्के यांच्या मालकीच्या दोन मिळकती सील करण्यात आल्या. या मिळकतींची चार लाख 26 हजार 514 व पाच लाख साठ हजार 82 इतकी थकबाकी होती. मिळकतधारकांनी आपली थकबाकी वेळेत जमा करावी व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटी बस भाडेवाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक
पुढील बातमी
घराच्या छतावर सोलर बसवा, अन् वीजबिल विसरा

संबंधित बातम्या