कष्टकरी महिलांचा सत्कार त्यांना नवीन उर्जा देणारा; पद्मश्री डॉ ग गो जाधव ग्रंथालयाच्यावतीने नवदुर्गा सन्मानित

by Team Satara Today | published on : 30 September 2025


सातारा :  पद्मश्री डॉ ग गो जाधव ग्रंथालयात नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा  'नवदुर्गा' म्हणून विशेष सत्कार करण्यात आले. तसेच याप्रसंगी  महिला लेखकांच्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती छायाताई अरविंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्वसामान्य महिला, कष्ट करून घर उभं करणाऱ्या महिला याच खऱ्या अर्थाने समाजासाठी नवदुर्गा असतात. कुटुंबावर आलेले संकट आणि आव्हाने परतवून लावण्याची ताकद या नवदुर्गांमध्ये असते."

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ग्रंथालयाच्या हितचिंतक श्रीमती छायाताई चव्हाण यांनी हे गौरव उद्गार काढले.  ग्रंथालयाच्या कार्यवाह सुनिता कदम यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या  " कष्टकरी महिला याच विकास, समानता आणि सक्षमीकरण या तिन्ही स्तंभावर समाजाला जागृत ठेवत असतात. विकास आणि सक्षमीकरणासाठी कोणत्याही क्षेत्रातील महिलांना 'ग्रंथ हेच पथ दर्शक' ठरत असतात. म्हणून ग्रंथालयाच्या आवारात होणारा हा नवदुर्गांचा सत्कार हा अत्यंत महत्त्वाचा आहे."

या नवदुर्गांमध्ये श्रीमती जयश्री कुडाळकर (स्वच्छता कामगार), सौ. पुष्पा लाखे (स्वच्छता कामगार), सौ.दिपाली जाधव (कापड व्यावसायिक), सौ.नेहा घोरपडे(फॅशन डिझायनर), सविता माजलकर n(टेलरिंग व्यवसाय), सौ.साधना राऊत (उपग्रंथपाल), सौ.अनिता शेंडे (लिपिक), सरिता मांढरे (गृहिणी),सौ.स्वाती मोरे (घरकाम) इत्यादी महिलांचा समावेश होता.

याप्रसंगी सौ. मंगल चव्हाण, सौ. शुभांगी टापरे, सौ.लोखंडे, श्रीमती निला कुलकर्णी इत्यादी जाधव ग्रंथालयाच्या "वुमन्स बुक क्लबच्या" सदस्य व इतर वाचक महिला उपस्थित होत्या. या सर्वांनी या नवदुर्गांना शुभेच्छा दिल्या. ग्रंथालयाच्या संचालक डॉ प्रतिभा पाटणे यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले.  ग्रंथालयाचे सर्व संचालक व ग्रंथप्रेमी वाचक ही याप्रसंगी उपस्थित होते.ग्रंथालयाच्या सेवक वर्गाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पानमळेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी निकाली
पुढील बातमी
भुईंज येथील भोसले टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आदेश

संबंधित बातम्या