साताऱ्यात फुटपाथवर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीमधून ३ लाखांची रोकड लंपास

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा : येथील पोस्ट ऑफिस समोरील फुटपाथवर पार्क केलेल्या मोपेड गाडीच्या डिकीमधून ३ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दि.२३ रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

याप्रकरणी नंदकुमार राजेंद्र जाधव (वय ३३ रा. दरे खुर्द,महादरे सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी,जाधव यांनी सिटी पोस्ट ऑफिस समोर असलेल्या फुटपाथवर मोपेड दुचाकी पार्क करून तिच्या डीगीमध्ये जवळ असलेली ३ लाखांची रोकड ठेवली होती.त्यानंतर ते त्यांच्या कामासाठी गेले असता चोरट्याने लक्ष ठेऊन केवळ अर्धा तासाच्या आत दुचाकीला लक्ष करत तीन लाखांची रोकड लंपास केली.माघारी आल्यानंतर नंदकुमार जाधव यांना डीगी साईडने उघडली असल्याचे निदर्शनास आले.आसपास विचारपूस केली असता त्यांना त्याबाबत माहिती मिळु शकली नाही.आपल्या पैश्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची खबर दिली. अधिक तपास पोलीस हवालदार बनकर करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगर जगतापवाडीत घरफोडी; सुमारे ८.९४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात भीतीचे वातावरण
पुढील बातमी
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी घ्या; प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करा - दलित महासंघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

संबंधित बातम्या