सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून 2021 ते 6 एप्रिल 2025 दरम्यान अंकिता निखिल मेहता सध्या रा. पिरवाडी, सातारा या विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती निखिल प्रवीण मेहता, सासू अंजना प्रवीण मेहता, सासरे प्रवीण खेमचंद मेहता सर्व रा. मीरा-भाईंदर वेस्ट, जि. ठाणे आणि नणंद पूजा विशाल जैन रा. कल्याण, मुंबई यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 April 2025