सातारा : कार मधून अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये व कागदपत्रे चोरून नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी दुपारी सव्वा चार ते साडेचार दरम्यान श्रीरंग उत्तम सावंत रा. कोडोली, सातारा यांनी त्यांची कार कणसे होंडा शोरूम शेजारील सर्व्हिस रोडच्या डाव्या बाजूस पार्क करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून गाडीत मागील सीटवर ठेवलेली चॉकलेटी रंगाची लेदर ची बॅग त्यात असलेली 25 हजार रुपये रोकड व कराड अर्बन बँकेचे 2 चेक चोरून नेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.