सातारा, दि. १७ : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, होेश मे आओ..होम मे आओ, नितीश कुमार होश में आओ' अशा घोषणा देत बौध्द गया येथील बौध्द विहार हे बौध्द बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौध्द महासभेतर्फे बुधवारी साताऱ्यात जनआक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला.
सातारा येथील शाहू चौकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात जिल्हाभरातील बौध्द बांधव सहभागी झाले होते. भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा यांनी या मोर्चाचे आयोेजन केले होते. जागतिक बौध्दांचे श्रध्दास्थान व जेथे भगवान बुध्दांना बुध्दत्व प्राप्त झाले.
त्या बुध्दगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे आद्य प्रणेते धम्मपाल यांच्या जयंती दिनानिमित्त व दि. बुध्स्टि सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती, महू जन्मभूमी आणि नागरपूर दीक्षा भूमीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे सर्वत्र आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चामध्ये शेकडो बौध्द बांधव सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, रिपाईच्या आठवले गटाचे अशोकराव गायकवाड, पार्थ पोळके, गुणरत्न मावळा, संदीप जाधव, आदित्य गायकवाड, गौतम भोसले, अनील वीर, विशाल भोसले आदी उपस्थित होते.