सातारा : फडतरवाडी, ता. कोरेगाव येथे तब्बल 39 खैर वृक्षांची तोड करून त्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना कोरेगाव वनविभागाने ताब्यात घेतले आहे .या कारवाईमध्ये खैरवृक्षाचे 39 ओंडके ताब्यात घेण्यात आले आहे.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावच्या वनापरिक्षेत्राधिकारी सुरेखा जगदाळे यांनी ही कारवाई केली . या कारवाई मध्ये वनपाल सुभाष बडदे यांनी भाग घेतला होता .कोरेगावच्या वनविभाग फिरत्या पथकाला फडतरवाडी येथे खैरवृक्षाची तोड असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती .जगदाळे यांचे नेतृत्वाखाली फिरत्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा मारला.
विजय नरळे अजय कांबळे रूपाली परदेशी यांना त्या ठिकाणी तीन इसम पळून जाताना दिसले .राहुल दुर्योधन गायकवाड, सुरज मीनानाथ अडागळे, जयदीप मीनानाथ आडगळे (सर्व रा. विखळे) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या तिघांनी मशीन कटरच्या साह्याने 29 खैरवृक्षांची लाकूडतोड केल्याचे स्पष्ट झाले .संबंधित मुद्देमाल आणि एक मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे त्यांना कोरेगाव न्यायालयात हजर केले असता या तिघांना एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे . .वनपरिक्षेत्राधिकारी सुरेखा जगदाळे पुढील तपास करत आहेत .