सातारा : सातारा शहरवासीयांना आता विकासात्मक बदल हवा आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी भाजपला साथ द्या, असे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी केले आहे.
सातारा शहरासह हद्दवाढीत समाविष्ट भागातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी नवीन योजना मंजूर केल्या आहेत. २४/७ सातारकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी राजवाडा परिसरात चार मजली पार्किंग साठी इमारत मंजूर झाली आहे.त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच शहराच्या बाजूने रिंग रोड करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून सरकारच्या माध्यमातून सातारा शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. आगामी काळातही विविध विकासयोजना राबवून शहराचा कायापालट घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सातारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने आज शहरात विविध ठिकाणी पदयात्रेचे आयोजन केले होते. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे नेतृत्वाखाली व खासदार उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मोहिते यांनी प्रभागात जावून तेथील मतदारांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. शहरात पदयात्रा, प्रचारादरम्यान अमोल मोहिते यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपने स्वच्छ व पारदर्शी कारभार केला असून भविष्यातही सातारा शहराच्या हिताचे काम केले जाणार आहे. सातारा हा भाजपचा बालेकिल्ला असून सर्व जुने व नवीन कार्यकर्ते एकदिलाने सातारा नगरपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली आहे. साताऱ्याच्या जनतेला स्वच्छ व पारदर्शक कारभार देण्यासाठी मी कटिबद्ध असून साताऱ्याला विकासात्मक बदल हवा आहे. तो भाजपच्या मार्फत नक्कीच घडेल, असा विश्वास अमोल मोहिते यांनी व्यक्त केला.
पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद..
सातारा नगर पालिका निवडणुकीतील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार निशांत पाटील, भारती सोलंकी, चेतन सोलंकी आणि रेणू येळगांवकर यांच्या प्रचारार्थ सदरबझार परिसरात काढण्यात आली पदयात्रेला नागरिकां