सातारा : शेंद्रे येथील साखर कारखान्यासमोर सुकी मासोळी विक्री करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने हिसका देऊन लुटून नेल्याची घटना दि १६ रोजी घडली आहे.याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लता महादेव वाघमारे (वय ३५ रा.वळसे ता.जि सातारा) यांचे सुक्का मासोळी विक्रीचा शेंद्रे या ठिकाणी व्यवसाय आहे घराच्या समोरील कट्ट्यावर त्या मासोळी विक्रीसाठी बसल्या असताना तिथे एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला आणि त्याने सुकट कशी देणार अशी विचारणा केली.
यावेळी 120 रुपये पावशेर अशी किंमत सांगितल्या नंतर त्या व्यक्तीला सुकट हवी आहे असा समज करून ती देण्यासाठी लता वाघमारे उठल्या असता त्यांना दुचाकीवरून आलेल्या 22 ते 25 वयोगटातील असलेल्या युवकांनी धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील एकूण 80 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या चेनमध्ये काळे मणी असलेले 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण आणि मिनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकवून पळ काढला याबाबत वाघमारे यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत दुचाकी वरील तरुणाने पोबारा केला. या बाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत