झेडपीचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे यांचे निधन

by Team Satara Today | published on : 24 May 2025


सातारा : कोडोली, ता. सातारा गावचे पूत्र, खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि ऊर्फ प्रदीप साळुंखे यांचे शनिवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. 

रवि साळुंखे यांनी काही वर्षे दैनिकामध्ये छायाचित्रकार म्हणून काम केले होते. गेली ३७ वर्षे ते कोडोली झेडपी गटाच्या राजकारणात होते. या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आजअखेर ग्रामपंचायतींची एक हाती सत्ता राखली आहे. साळुंखे यांनी सातारा पंचायत समितीचे कोडोली गणाचे सदस्य व विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. ते जिल्हा परिषद गट कोडोलीमधून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळी उपाध्यक्ष तथा बांधकाम समितीचे सभापती होते. त्यांच्या काळात स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहाची उभारणी झाली.

संगममाहूली येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर कोडोलीतील बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होते. झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ओबीसी सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी गौरी गुरव
पुढील बातमी
अवैधरित्या दारूची वाहतूक प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या