फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. पन्नास वर्षापूर्वी फलटण तालुक्यात शिक्षणाचा विस्तार म्हणावा तसा झाला नव्हता. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. अशा या शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकाला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या ध्येयाने, साक्षर करण्याचे हेतुने कै.कर्मवीर आण्णांच्या प्रेरणेने आणि कै.यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने सुभाषकाकांच्या वडिलांनी, कै.नामदेवराव बेडके तथा नानांनी या खडतर काळात आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्रीराम एज्युकेशन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी म्हणजे 50 वर्षांपूर्वी शाळा काढणे एक धाडसत होते. कै. नानांनी काढलेल्या शाळांचा प्रचार आणि विस्तार करणे ही गोष्ट महाकठिण होती. अशा वेळी योगायोगाने शैक्षणिक क्षेत्रात प्रविष्ठ झालेल्या सुभाषकाकांनी, ध्येयाचा मेरुमणि बनून, शैक्षणिक प्रचाराची, विस्ताराची तालुकाभर वाढ करण्याचे ध्येय निश्चित केले आणि ते तडीस नेलेले फलटणकरांनी पहिले आहे. सुभाषकाकांच्या या अफाट कार्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा एक अविभाज्य भाग म्हणजे सुभाषकाका असे समीकरण झाले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी समाजातील तळागाळांतल्या वंचितांच्या शिक्षणासाठी फारशा सोई उपलब्ध नव्हत्या. अशावेळी समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाखांचा विस्तार केला. कोणाचेही आर्थिक पाठबळ नसताना पण सामान्यांचा जनाधारावर त्यांनी हे अलौकिक कार्य पार पाडले. श्रीराम एज्युकेशन संस्थेची संस्थात्मक (संख्यात्मक) व गुणात्मक वाढ सुभाषकाकांनी केली. शिक्षणाने समाजात परिवर्तन होते, माणूस विचारशील बनतो. त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही या विचारावर ते ठाम होते. शिक्षणासह मूल्यविचारांबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखा आजही बदलत्या काळाबरोबर नेहमीच प्रगतशील आणि ज्ञानाबद्दल अद्ययावत राहिल्या आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |