सातारा : लोणेरे रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने आयोजित केलेल्या विभागीय विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी फार्मसीमधील विद्यार्थी प्रतीक जाधव याने 800 मीटर रनिंग या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर याच क्रीडा प्रकारात 400 मीटर रनिंग मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल त्याचे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळीप्राचार्य डॉ नागेश अलुरकर उपप्राचार्य डॉ योगेश गुरव विभाग प्रमुख डॉ अविनाश भोसले क्रीडा विभाग प्रमुख डॉ मनोज शिंदे प्रबंधक हेमंत काळे आदी प्रमुख उपस्थित होते. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस मिरज येथे संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धेत सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील फार्मसी महाविद्यालयातील 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थ्यांना तुषार जाधव हणमंत जाधव यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे आप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले.