इस्त्रायल-हमास युद्ध थांबणार

इस्त्रायल सुरक्षा मंत्रिमंडळाची युद्धविरामला मंजुरी

by Team Satara Today | published on : 18 January 2025


अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या इस्त्रायल-हमास युद्ध आता थांबणार असल्याची चिन्ह आहेत. इस्त्रायल सुरक्षा मंत्रिमंडळाने युद्ध विरामाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली. इस्त्रायल माध्यमांनी युद्धविरामचा हा निर्णय ओलीसांच्या सुटकेसाठी केलेला करार असल्याचे म्हटले आहे. अजून यावर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

आता पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

पंतप्रधान वेजामिन नेतन्याहू मंत्रिमंडळातील अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गवीर यांनी सुरक्षा मंत्रिमंडळातील या निर्णयाच्या विरोधात मतदान केले. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नेतन्याहू यांनी करारावर स्वाक्षरी करून दोहाहून परतलेल्या टीमसोबत बैठकही घेतली होती. आता या करारावर मंत्रिमंडळात निर्णय होईल. त्यानंतर युद्धविराम होणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे.

इस्त्रायलच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी 3:30 वाजता होणार आहे. परंतु अनेक मंत्र्यांसह हरेडी यांचे मत होते की करारावर मतदान शनिवारपर्यंत केले जावे. गुरुवारी संध्याकाळी इस्रायली प्रसारमाध्यमांमध्ये बातमी दिली. त्यात म्हटले की, मंत्रिमंडळाची पूर्ण बैठक शनिवारी संध्याकाळी घेतल्यास रविवार ते सोमवार या कराराच्या अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो. तथापि, नेतन्याहू यांच्या कार्यालयाने नंतर सांगितले की, करार ठरल्याप्रमाणे रविवारी अंमलात येईल.

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने युद्धाची घोषणा केली होती. हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलच्या 300 नागरिकांना कैद केले होते. त्यापैकी इस्त्रायलीने केलेल्या हल्ल्यामुळे डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलच्या दाव्यानुसार अनेक ओलीसांची हमासने हत्या केली होती.

हमासच्या कैदेत अजून इस्त्रायलचे 33 नागरिक ओलिस असल्याचे सांगितले जाते. परंतु त्यापैकी किती जिवंत आहेत हे स्पष्ट नाही. हमासने सर्व नागरिकांना सोडावे आणि मारले गेलेल्यांचे मृतदेह परत करावेत. या कैद्यांची सुटका आणि इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनींची सुटका होण्यासाठी ४२ दिवस लागतील.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 दिवसांत मिळणार हॉल तिकीट
पुढील बातमी
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज"

संबंधित बातम्या