सातारा : वडिलांच्या इस्टेटिबाबत विचारायचे नाही, अशी धमकी देत एकाला तिघा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार हॉटेल प्रीतीच्या पार्किंग परिसरात दिनांक 23 मे रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला.
अरुण रामचंद्र माने वय 49 राहणार केसरकर पेठ हे या मारहाणीत जखमी झाले असून याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दीपक रामचंद्र माने, कुंदा दीपक माने, तुषार दीपक माने सर्व रा. केसरकर पेठ यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तिघांनी फिर्यादी अरुण यांना वडिलांचे बँकेतील पैसे जमीन याबद्दल विचारायचे नाही, अशी धमकी देऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.