साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना

by Team Satara Today | published on : 15 July 2025


सातारा : साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येते.  या योजनेचा उद्देश हाताने मेहतर काम करणाऱ्या, मानवी विष्टांचे वहन करणाऱ्या, व्यक्ती किंवा बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती, अस्वच्छ व्यवसायाशी संबंध परंपरेने असलेले सफाईगार, कातडी कमावणारे आणि कातडी सोलणारे, कचरा गोळा करणे व उचलणे या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देणे हा असून या योजनेसाठी सर्व जाती धर्माचे विद्यार्थी पात्र आहेत. ही शिष्यवृत्ती पहिली ते दहावी पर्यंत किंवा प्रीमॅट्रीक स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांला देय राहील. ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवक व सरपंच तसेच नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी  या प्राधिकाऱ्यांनीचे अस्वच्छ व्यवसाय करीत असलेबाबत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

पहिली ते दुसरी पर्यंत दर महा रुपये 225 रुपये वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा दर आहे. इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंत वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 225 तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 700 रुपये इतका शिष्यवृत्तीचा दर आहे.  वार्षिंक तदर्थ अनुदान हे वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 750 रुपये तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये इतके आहे.  

या योजनेसाठी सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित कायमस्वरुपी विना विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजनेकरीता शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज करणेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यात येऊन सन 2024-25 वर्षाकरीताचे अर्ज prematric.mahait.org>Login  महा आयटी या पोर्टलवर पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत असे आवाहन जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावर यांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पेन्शन, शेतकरी निधीतून वसुली बेकायदेशीर : लालासाहेब भिसे
पुढील बातमी
विकासाचा बॅकलॉक भरुन काढण्यासाठी मागेल तेथे काम दिले जाईल

संबंधित बातम्या