सदर बझारमध्ये चैन स्नॅचिंग

by Team Satara Today | published on : 04 April 2025


सातारा : सदर बझारमध्ये दोन अज्ञातांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील झेड पी चौक ते कनिष्क हॉल या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन जबदरस्तीने हिसकावून ओढून नेली. चेन स्नॅचिंगच्या या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी उषा बापूसाहेब जाधव (वय 60, रा. सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 3 एप्रिल रोजी घडली आहे. 1 लाख 50 हजार रुपयांची सोन्याची चेन असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा
पुढील बातमी
सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू

संबंधित बातम्या