तारेमध्ये वीज सोडल्याने एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 23 June 2025


मेढा : सनपाने, ता. जावली येथे शेतात बांधावर लावलेल्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता. त्याला स्पर्श झाल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू झाला. अशोक सुभाष कोंढाळकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी विठ्ठल उर्फ आशिष गोविंद दुर्गावळे (वय 39, रा. सनपाने ता. जावली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बबन बाबुराव कोंढाळकर यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक हा त्यांचा पुतण्या आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सनपाने गावच्या हद्दीत मोहन कोंडीबा दुर्गावळे यांच्या शेताजवळील बांधावर विठ्ठल उर्फ आशिष दुर्गावळे याने तार बांधली होती. त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. बेकायदेशीरपणे बायडिंग तार लावून वीज प्रवाह सोडल्यामुळे अशोक कोंढाळकर यांचा त्याला स्पर्श होवून मृत्यू झाला. ही घटना दि. 18 जून रोजी घडली. याप्रकरणी विठ्ठल दुर्गावळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सपोनि सुधीर पाटील करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मार्ली-भालेघर रस्ता खचला
पुढील बातमी
अशीही सातारी तर्‍हा; खड्डा झाला मोठा, रस्ता झाला छोटा

संबंधित बातम्या