सातारा : शाहूपुरीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी येथे चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करुन घरातून 1 लाख 13 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी केले. चोरट्यांनी घरातून सोन्याची चेन, सोन्याचे टॉप्स, सोन्याचे पैंडल व रोख रक्कम 7 हजार रुपये असा मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी अजय गंगाराम झोरे (वय 26, रा. गडकर आळी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 17 जुलै रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.