सातारा : डबेवाडी, ता.सातारा येथून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डबेवाडी, ता.सातारा येथून रामदास ज्ञानदेव मोरे (वय 55, रा. कारी ता.सातारा) हे बेपत्ता झाले आहेत. ही घटना दि. 3 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.