सातारा : सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी कोडोली येथील एक युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 13 रोजी शाहूपुरी परिसरात राहणारी 21 वर्षीय युवती ही घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.