जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनचे कामकाज शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच ; ऑनलाइन प्रणालीवर निविदा प्रकिया

by Team Satara Today | published on : 07 January 2026


सातारा  : "हर घर जल" चे शासनाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र शासनाची जल जीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, शासननिर्णय, तसेच पी एफ एम एस  प्रणालीव्दारे पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबविली जात आहे, अशी माहिती  जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठ्याचे  कार्यकारी अभियंता यांनी दिली.

एका ठेकेदारास एकापेक्षा अधिक कामे मिळाल्याचा अर्थ घोटाळा झाला असा होत नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्रसिध्द करणेत आलेल्या 20 निविदे मध्ये सहभागी सर्व निविदाधारकाकडून आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाइन खुल्या व स्पर्धात्मक पध्दतीने मागविणेत आलेली आहेत. सर्व निविदा प्रकीया ही ऑनलाइन पध्दतीने व पारदर्शक पध्दतीने व सर्व शासन नियमांचे पालन करूनच पार पाडलेली आहे. यामध्ये ज्या निविदाधारकाचे सर्वात कमी दर आहेत अशाच निविदाधारकास वित्त विभाग जिल्हा परिषद सातारा यांचेकडून तपासणी झाल्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन जिल्हा परिषद सातारा यांचे मान्यतेने ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कार्यरंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत विविध कामांसाठी www.mahaetender.com या  ऑनलाइन  प्रणालीवर निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. मुळात सर्व कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी मिळाल्या नंतरच पुढील कार्यवाही करण्यात येते. "हर घर जल " ही योजना 15 ऑगस्ट 2019 पासून शासना मार्फत राबविणेत येत आहे. आज अखेर एकूण 1610 कामांना मजूरी देणेत आली असून 1097 योजना भौतिकदृष्ट्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि बाकी योजना या प्रगती पथावर आहेत. तसेच 17 ऑक्टोबर 2025 रोजी 19.88 कोटी अनुदान जे प्राप्त झाले त्या आदेशानुसारच देयके अदा करणेत आली आहेत. या आदेशामधील टिप क्रं 4 नुसार ज्या योजनांची प्रगती 50 टक्के पेक्षा जास्त झाली आहे अशा योजनासाठी वापरण्यात यावा व उर्वरीत योजनासाठी 20 टक्के निधीचा वापर करावा असे नमूद करणेत आलेले आहे व टिप क्रं. 5 मध्ये सदरचा निधी वाटप करतेवेळी कोणत्याही प्रकारची दंड तसेच वसूली करणेत येवू नये असे नमूद आहे त्या मुळे "निधी वाटपात मनमानी" असा जो आरोप करण्यात आलेला आहे तो तथ्यहीन व पुर्णतः चुकीचा आहे.

सन 2022 मध्ये ज्या प्रमाणे जवळपास 200 निविदाधारकांना प्रथम 2.5 टक्के सुरक्षा ठेव प्रथम देयकामधून कपात करणेची तरतूद केलेली होती त्याच धर्तीवर या वर्षात जिल्हा पाणी व स्वच्छता समिती, सातारा यांचे दिंनाक- 24 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी सातारा यांचेशी झालेल्या चर्चेनुसार आणि इतिवृत्ताप्रमाणे व त्यांचे मान्यतेनेच सदरची तरतूद करणेत आली आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत विविध कामांसाठी www.mahaetender.com या  ऑनलाइन  प्रणालीवर निविदा प्रकिया राबविली जात आहे. सध्या जवळपास 263 निविदा प्रसिध्द केल्या असून त्यामध्ये जास्तीत जास्त निविदाधारकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करणेत आलेले आहे, अशी माहितीही कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांनी खुलाशाद्वारे दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट
पुढील बातमी
राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय माता दिवस’ म्हणून साजरा व्हावा; मुस्लिम मावळ्यांची जिल्हा प्रशासनाकडे ऐतिहासिक मागणी

संबंधित बातम्या