07:48pm | Nov 03, 2024 |
सातारा : जावली तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले महू-हातगेघर 25 वर्षांपूर्वी 90 टक्के पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर उरलेले काम सत्ताधार्यांना दिसले नाही का ? विकास म्हणजे ठेकेदारांच्या सोयीची कामे म्हणजे विकास नाही, अशी जळजळीत टीका अमितदादा कदम यांनी महू येथील सभेमध्ये केली. धरण पूर्ण झाले तर 1300 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या शेतकर्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला निश्चित मतदान करा, असे कळकळीच आवाहन महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी केले.
महू येथील काळभैरवनाथाच्या मंदिराच्या सभा मंडपात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, जावली तालुकाप्रमुख नितीन गोळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष सुरेश गोळे, जावली संघटक रवी चिकणे, युवा सेना तालुकाप्रमुख जीवन शिंदे, उप तालुकाप्रमुख रवी पार्टे, शिवआरोग्य सेनाप्रमुख प्रकाश गोळे, उमेश दुर्गावळे इत्यादी उपस्थित होते.
अमितदादा पुढे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही संघटना राजकीय पक्षांमध्ये भांडण लावून ते फोडण्याचे उद्योग करत आहेत. मतदारांनी मतदान प्रक्रियेला केवळ एक संधी म्हणून न बघता लोक चळवळ म्हणून पहावे. त्या माध्यमातून परिवर्तन साधने शक्य होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन या फोडाफोडी करणार्यांच्या विरोधात एक लढा उभारलेला आहे. या लढ्यामध्ये मतदार म्हणून आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. जावली तालुक्यातील महू-हातगेघर धरण का अपूर्ण राहिले ? जावळी तालुक्याचा विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या आकड्यांची ठेकेदारांच्या सोयीची कामे, असा त्याचा अर्थ नाही. हे धरण जर पूर्ण झाले असते तर 1300 हेक्टर जमीन धरणाच्या पावणेदोन टीएमसीच्या क्षमतेमुळे ओलीताखाली आली असती. येथेच शेतकर्यांच्या मुलांना रोजगार आणि पर्यटन व्यवसायाला संधी मिळाली असती. मात्र सत्ताधार्यांनी या धरणाकडे अजिबात संवेदनशीलतेने पाहिले नाही. हे धरण अपूर्ण ठेवायचे पाप कोणी केले, याचे उत्तर जनतेला ठाऊक आहे. परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये मतदारांनी या बाबी लक्षात ठेवूनच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
जावली तालुकाप्रमुख निलेश गोळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अमितदादा कदम, सदाशिव सपकाळ यांच्यासह शिवसेना जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारिणीच्या सदस्यांनी गणेशपेठ, रुईघर, शिंदेवाडी, काटवली, बेलोशी, दापवडी, महू, पिंपळी, गावडेवाडी, बलकवडेवाडी, बिरामणेवाडी, राजपुरेवाडी, हातगेघर, कावडी, सनपाने, टोपेवाडी, वाहगाव,रांजणी, करहर, खर्शी, बारमुरे, असा 25 गाव भेटीचा दौरा पार पाडला. या दौर्यामुळे जावली तालुक्यामधील शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |