सातारा तालुक्यातील चिखली गावच्या हद्दीत पवनचक्कीच्या टॉवरवरील तांब्याच्या तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 26 March 2026


सातारा : सातारा तालुक्यातील चिखली गावच्या हद्दीत सुझलॉन कंपनीच्या पवनचक्की टॉवर वरील तांब्याच्या ८ हजार रुपये किमतीच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेसचे सुरक्षा अधिकारी दीपक वसंत घाडगे (वय ४७. रा. म्हावशी, ता. पाटण) यांनी तालुका पोलिसात दिली आहे.  अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात भागीदारीमधील ट्राडेन्ट फिटनेस नावाची जिम दुसऱ्यास विकून फसवणूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातारा शहरात कमानी हौदासमोर शालगर दुकानाजवळ पार्क केलेलया दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या