सातारा : स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमीत्त कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी ग्रामपंचायत प्रशासन व माजी सैनिक यांच्या सहभागाने कारगिल विजय दिवस दिनांक २६ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करावेत, असे आवाहन केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली व सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
ज्या गावामध्ये 50 पेक्षा कमी, 50 पेक्षा जास्त माजी सैनिक असतील अशा गावच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे फोटो व त्याबाबतचा अहवाल सरपंचांच्या स्वाक्षरीने दिनांक 27 जुलै 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथे सादर करणाऱ्या माजी सैनिक संघटनांस प्रोत्साहन म्हणून प्रथम क्रमांकास अनुक्रमे रू. 10 हजार व पाच हजार बक्षीस देण्यात येतील. तरी माजी सैनिक समुहांना बक्षीस देण्यात येईल. अनुक्रमे 20 हजार, 15 हजार तरी जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी कारगिल विजय दिवशी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे.
कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलैला वृक्षारोपण
by Team Satara Today | published on : 22 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा