शिवाजीनगरमध्ये मोलकरणीने केली घरफोडी; २ लाखांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 22 January 2026


सातारा : जुनी एमआयडीसी, शिवाजीनगर, गणेश चौक येथे राहणाऱ्या सुनीता शिरीष काकडे (वय ६०) यांच्या घरात मोलकरणीनेच घरफोडी करून सुमारे दोन लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.दि. ८ ते १६ जानेवारी दरम्यान लोखंडी कपाटातील सुटकेसमध्ये ठेवलेली गुलाबी खडा असलेली सोन्याची साखळी, राणीहार, चांदीची वाटी व चांदीचे जोडवे असा मुद्देमाल घरकामासाठी येणारी अरुणा भोसले (रा. कुमठेकर भवन जवळ, कोडोली, सातारा) हिने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी दि. २० रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळ


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोली येथील सनी हॉटेलच्या पार्किंगमधूनयेथून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
असंघटित कामगारांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलजावणी करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या