सातारा : सस्तेवाडी, ता. फलटण येथे कुटी मशिनमध्ये हात अडकून छोटू कुमार (वय १९, रा. आत्मज, रा. बिहार)) याचा मृत्यू झाल्याची घटना दि. २८ रोजी सायंकाळी सायंकाळी वाजता घडली असून याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्विग्विजय देशमुख याच्या फिर्यादीनुसार सस्तेवाडीतील सोमा शिंदे याचा फोन आला की, तुमच्या गोठ्यावरील छोटु कुमार याचा हात कुटी मशिनमध्ये अडकला असून त्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे लगेच मित्र राहुल घाडगे, तेजस कांबळे यांना गोठ्यावर जाण्यास सांगितले. दुपारी साडेतीन वाजता गोठ्यावर देशमुख हा गोठ्यावर पोहचला तेव्हा तेजसने पोलिसांना कळवले होते. तेथे पोलीस आले होते. त्यानंतर छोटुचा कुटी मशिनमध्ये अडकलेला हात बाहेर काढून फलटण उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबतचा तपास हवालदार खरात हे करत आहेत.