सातारा : कृष्णानगर कॅनॉलजवळील झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
या कारवाईत ५१० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय नामदेव घाडगे (वय ४२, रा. कृष्णानगर, मूळ रा. साखरवाडी, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सुहास कदम करत आहेत.