12:52pm | Sep 05, 2024 |
निरोगी जीवन जगण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी आपल्याला सतत शारीरिक हालचाल करणे किंवा अॅक्टिव राहणे फार महत्वाचे आहे. मात्र, बरेच लोक बिझी शेड्युलमुळे जिममध्ये अनेक तास एक्सरसाईज करू शकत नाहीत. अशात पायी चालणं सगळ्यात सोपी आणि चांगली एक्सरसाईज मानली जाते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, निरोगी जीवनासाठी, फीट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालावं?
आठवड्यातून किती पावलं चालावीत?
एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा पाच हजार पावलं चालणाऱ्यांचं जीवन निरोगी आणि जास्त असतं. इतकं चालल्याने डायबिटीस, हार्ट डिजीज, स्ट्रोक, लठ्ठपणा, डिप्रेशन अशा आजारांपासून बचाव करता येतो.
स्मार्ट वॉचची मदत
निरोगी राहणं सगळ्यांनाच आवडतं. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात, वाढलेल्या कामाच्या व्यापात अनेकांना वेळ मिळत नाही. अशात तुम्ही पायी चालणं हा सगळ्यात बेस्ट उपाय वापरू शकता. आजकाल बरेच लोक स्मार्ट वॉचचा वापर करतात. याचे अनेक फायदेही आहेत. वेळ बघण्यासोबतच यात पल्स रेटपासून ते तुम्ही दिवसभर किती पावलं चाललात हेही दिसतं.
वयानुसार ठराव अंतर
फीट राहण्यासाठी किती पावलं चालावं, हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. एका दिवसात १० हजार पावलं चालणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं. पण वयानुसार प्रत्येकांसाठी किती चालावं याचं प्रमाण वेगवेगळं असतं.
३ वर्ष वाढू शकतं जीवन
काही महिन्यांआधी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीक्सच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, २ वर्षापर्यंत दर आठवड्यात तीन वेळा कमीत कमी ५ हजार पावलं चालण्याची सवय ठेवणाऱ्या लोकांचं आयुष्य ३ वर्षाने वाढू शकतं.
पायी चालण्याचे फायदे
रोज पायी चालण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. रोज पायी चालल्याने शरीर अॅक्टिव राहतं आणि दिवसभरातील कामे सहजपणे करता येता. पायी चालल्याने हार्ट रेट सुधारतो आणि ब्लड प्रेशरही कमी होतो. जॉईंट्समधील वेदना दूर होतात. तसेच चिंता-डिप्रेशन अशा समस्याही दूर होतात. हृदयरोगांचा धोका टाळतो. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |