सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचारीका महाविद्यालयात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी परवानगी मिळाली आहे. या महाविद्यालयात २ वर्षाचा एएनएम व ३ वर्षाचा जीएनएम हे पदविका अभ्यासक्रम सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम ४ वर्षाचा असणारआहे. सार्वजानिक आरोग्य विभागांतर्गत बी.एस.सी. नर्सिंग सुरु करण्याची मान्यता मिळवणारा सातारा हा महाराष्ट्रातील तिसरा जिल्हा झाला आहे.
जिल्ह्यातील होतकरु विद्याार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण स्थानिक पातळीवर घेता येईल . या शिक्षणाने विद्यार्थ्यांन परदेशात जावून आरोग्य सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नर्सिग क्षेत्रात पदवी शिक्षण सुरु करणारे शासकीय परिचारीका महाविद्यालयास जिल्हास्तरीय पहिली शासकीय संस्था होण्याचा मान मिळाला आहे. या अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे तसेच भविष्यात विविध पदव्युत्तर नर्सिंग अभ्यासक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे सांगितले आहे.