सातारा शहरासह तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा :  सातारा शहरासह तालुक्यातील दोन दुचाकींची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ ते २६ दरम्यान संस्कृत रणजीत नलावडे (रा. वाढे, ता. सातारा), यांची घरासमोर पार्क केलेली एनफिल्ड कंपनीची बुलेट (क्रमांक एमएच ११ बीएन ०५५०) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, दि. २१ रोजी सकाळी सव्वा नऊ ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दादा दशरथ काळे (रा. कण्हेर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांची चार भिंती परिसरात असणाऱ्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी (क्रमांक एमएच ४५ पी १५३७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेसह तिच्या भावाला मारहाणप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सातारा बसस्थानक परिसरातून सात तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

संबंधित बातम्या