रहिमतपूर : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रहिमतपूर नगरपालिकेसाठी ७ कोटी ५८ लाख रुपयाचा निधी महायुती शासनाच्या माध्यमातुन मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे रहिमतपुरच्या विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
यामध्ये नगरपालिका वैशिष्टपूर्ण निधी मधून काशीद गल्ली येथे दत्त मंदिर सभागृह बांधण्यासाठी १ कोटी २० लाख भैरोबा मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी ७० लाख ,रामोशी गल्लीमध्ये सभामंडप बांधण्यासाठी ५० लाख, कोल्हटी वस्ती सभागृह बांधण्यासाठी ३० लाख , लिंगायत समाज दफनभूमी दुरुस्त करण्यासाठी ३० लाख , रामकृष्ण गल्ली मारुती मंदिर सभा बांधण्यासाठी २५ लाख , मातंग वस्तीतील खंडोबा मंदिर सभागृह बांधण्यासाठी २५ लाख , महालक्ष्मी मंदिरा पुढील सभागृह बांधण्यासाठी २५ लाख.
नांगरे गल्ली महालक्ष्मी मंदिर सभागृह बांधणे २० लाख , बेघर वस्ती सभागृह बांधणे २५ लाख , नंदीवाले समाज सभागृह बांधणे २० लाख ,टेक नाका येथे हनुमान मंदिर सभागृह बांधणे ३० लाख , चंद्रगिरी देवस्थान सभा मंडप बांधणे २५ लाख ,जत गल्ली भैरोबा गल्ली व्यायामशाळा साहित्य १० लाख या बरोबरच जिल्हा नियोजन नगरोत्थान निधी मधून चौंडेश्वरी मंदिर सभागृह बांधण्यासाठी १ कोटी २१ लाख , काशी विश्वेश्वर मंदिरापुढे सभागृह बांधण्यासाठी ६४ लाख , नगरपालिका दलितत्तोर निधी मधून वडूज रस्ता चंद्रकांत साळुंखे यांच्या घरापर्यंत काँक्रीट करणे २० लाख , नहरवाडी निकम वस्ती काँक्रीट करणे ११ लाख ७५ हजार , शिवराज भोसले यांच्या घरापासुन दीपक कदम यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणासाठी ८ कोटी ४८ हजार , राम तरडे बोळ कॉंक्रीट करणे ४ लाख ६१ हजार , काशीद गल्ली शेडगे व निकम बोळात काँक्रीटीकरणासाठी करणे ८ लाख ११ हजार रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
जिल्हा नियोजन मधून नहरवाडी येथे वाढीव वस्ती वरती विद्युत पोल बसवने ७ लाख ४० हजार रहिमतपूर येथे वाडी वस्ती वरती विद्युत पोल बसवणे १६ लाख २० हजार मंजुर झाले आहे. वरील मंजूर कामे पुर्ण झाल्यावर रहिमतपूर मधील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.