08:52pm | Apr 10, 2024 |
सातारा : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या पदाधिकार्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. सन 2024-25 या वर्षांसाठी चेअरमनपदी सुधीर ठोके, सेक्रेटरी हर्षद वालावलकर, व्हाईस चेअरमन सयाजी भोसले, ट्रेझरर पृथ्वीराज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर अनिल दातीर, सचिन देशमुख व सुधीर घार्गे यांची कौन्सिल मेंबरपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून निलेश पाटील, मंगेश लावंड, सुहास बगाडे, हेमंत कदम, मिलींद वाईकर, विवेक ठोके, शरद जाधव, शंभुराज पाटील, संदीप जाधव, विश्वास नारकर, अजय खटावकर, रणजित ढगे, मंदार खळदकर, शैलेंद्र जगताप, अलिन फडतरे, सचिन राजगे, अधिक जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ दिनांक रविवार 14 एप्रिल रोजी विठ्ठल मंगलम या भव्य दिव्य ठिकाणी रंगारंग कार्यक्रमांनी होणार असून नवनिर्वाचित चेअरमन सुधीर ठोके व त्यांच्या टिमला मावळते चेअरमन अनिल दातीर व सेक्रेटरी कौस्तुभ मोरे पदाची सूत्रे प्रदान करतील. या पदग्रहण सोहळ्याला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे वेस्ट झोनचे व्हाईस प्रेसिडेंट आनंद गुप्ता, बीएआयचे स्टेट चेअरमन अनिल सोनावणे, बीएआय माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, कालिका स्टील चे संचालक अनिल गोयल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
1941 सालापासून कार्यरत असलेली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था देशभरात बांधकाम व्यावसायिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा देशपातळीवरील संस्थेमधील बीएआय सातारा सेंटर हे एक उत्कृष्ठ ऍक्टिव्ह सेंटर म्हणून नावलौकिक राखून आहे. सातारा सेंटरतर्फे दरवर्षी बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सुद्धा काही समाजोपयोगी कार्यक्रम पार पाडले जातात. सातारा सेंटरच्या या नावलौकिकाला साजेसे जास्तीत जास्त कार्यक्रम घेऊन हे वर्ष पार पाडण्यासाठी मी व माझी टीम नक्कीच प्रयत्न करेल, असा मनोदय नवनिर्वाचित चेअरमन सुधीर ठोके यांनी व्यक्त केला.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |