सातारा : लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि नगरसेवक फिरोज पठाण मित्रसमूह आयोजित राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राजमाता जिजाऊ आणि युवा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ राजधानी सातारा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजभूषण पुरस्काराने विनायक राजाराम भोसले यांना गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नगरसेवक फिरोज पठाण, दैनिक ऐक्यच्या व्यवस्थापकीय संपादक ॲड. शिवानी पळणिटकर , नगरसेविका पूनमताई निकम, सिने अभिनेत्री अनुश्री ढम, नीता भोसले, रूपाली गुजर, प्रियांका सावंत, अमर सावंत, अश्विनी सुतार, पत्रकार धम्मशील सावंत, पत्रकार विठ्ठल हेंद्रे व संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका ढम उपस्थित होते. संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष मिलिंद लोहार यांनी सर्व मुख्य अतिथींचे स्वागत केले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व शाल देऊन गौरव करण्यात आला. जिजाऊ पुरस्कारार्थी यांचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देताना निवेदक तनुश्री जाधव यांनी व युवा पुरस्कार देताना संस्थेचे सचिव मिलिंद लोहार यांनी निवेदन केले. प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका ढम यांनी केले तर संस्थेची माहिती संस्थेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंदा पवार यांनी दिली.
जिजाऊ पुरस्कार 2026 पुढीलप्रमाणे रूपाली तामगिरे ,सुमन चव्हाण वनिता साळुंखे, स्नेहल पाटणे- संगीता गायकवाड, नभाली राजेंद्र चव्हाण आर्या सुप्रसाद कुंभार,जास्मिन पठाण - बोभाटे रुपाली घाडगे,वंदना अरविंद यादव दिपाली नवले, काजल घोरपडे,सुविधा साळुंखे सपना कावडे, स्नेहलता गायकवाड रक्षिता बनसोडे , रोहित बनसोडे वृक्षप्रेमी माधुरी पवार ,सीमा कुलकर्णी, अनुश्री ढम , रोहीणी पवार, शिवानी पळणीटकर, प्रियांका सावंत
(युवा पुरस्कार) प्राप्त नामनिर्देशन- रोहित बनसोडे अजितकुमार जाधव वस्ताद प्रमोद पाटील, उद्योजक बाळासाहेब जाधव ( अमित टेलर्स
समाजरत्न पुरस्कार -धम्मशील छायाबाई उत्तम सावंत ,सुरेश माने( समाजभूषण पुरस्कार) विठ्ठल हेंद्रे. (समाजरत्न पुरस्कार), सुजित पांडुरंग भोसले-युवा पुरस्कार तुषार हणमंत भोसले-यविशाल मोरे सुवर्णा तानाजी पाटील,मनीषा महेश आवळे, प्रमोद रामदास मोरे ( उत्कृष्ट उद्योजक).