सातारा : सातारा शहरालगत महामार्गावर टायर जाळून आंदोलन केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंकित वाघमारे, स्वप्नील हराळ, चेतन तुपारे, राकेश जाधव (रा.प्रतापसिंहनगर, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे आंदोलन दि. 28 जानेवारी रोजी दुपारी करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस गणेश जाधव यांनी तक्रार दिली आहे.
अवैधरित्या आंदोलन प्रकरणी चारजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 January 2025