सातारा : सदरबाजार येथील कूपर बंगला ते कनिष्क मंगल कार्यालयादरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांना कोयत्याने मारहाण करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगा व त्याचा मित्र यास कोयत्याने मारहाण करून ओम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने जखमी केले आहे. घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार कांबळे करत आहेत.