09:41pm | Sep 03, 2024 |
सातारा : येत्या 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. दि. 7 ते 17 सप्टेंबर या दहा दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सव काळात प्लाजमा लेझर लाईट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे व ध्वनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी यांच्यावर कठोर कारवाई करून त्या जागेवर जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
शेख यांच्या दालनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणाच्या काळात सर्वांनी शांततेने सण साजरा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, 8 सप्टेंबर गणपतीचा दुसरा दिवस, 11 सप्टेंबर गणपती उत्सवाचा पाचवा दिवस, 12 सप्टेंबर गौरी विसर्जन दिवस, 16 सप्टेंबर ईद ए मिलाद, 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशी या काळामध्ये ध्वनीक्षेपकांना सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वापर करता येणार आहे. ध्वनी क्षेपकांनी या काळामध्ये औद्योगिक क्षेत्रात सत्तर डेसिबल, वाणिज्य क्षेत्रात 55 डेसिबल, निवासी क्षेत्रात 25 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 40 डेसिबल मर्यादेतच ध्वनीक्षेपकांचा वापर करावयाचा आहे. यापेक्षा अधिक क्षमतेच्या डॉल्बी या नाकाबंदी करून जाग्यावर जप्त केल्या जाणार आहेत. याशिवाय लेझर बीम, प्लाजमा या मानवाला अपाय करणाऱ्या यंत्रणांना बंदी घालण्यात आली आहे.
सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे मंडप परिसरात बसवून त्याचे रिकॉर्डिंग किमान पंधरा दिवस जतन करावे, गणेशोत्सवांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना दर्शनासाठी स्वतंत्र रांग करण्यात यावी, गणेशोत्सव काळात टिंगल टवाळी करणाऱ्या सडकसख्याहरींवर लक्ष ठेवण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची पाच पथके साध्या वेषात तैनात राहणार आहेत. गणेश मंडळांनी विद्युत व्यवस्था रोषणाई करताना चांगल्या दर्जाचे वायर्स जोडणी करावी. सदरची जोडणी महावितरण विभागाकडून करावी. गणेश मूर्तीच्या संरक्षणाकरता मंडळाचे कमीत कमी पाच कार्यकर्ते व खाजगी सुरक्षा रक्षक 24 तास हजर राहतील. गणेश मंडळांनी वर्गणी मागताना कोणावरही जबरदस्ती करू नये ती ऐच्छिक असावी. यासंदर्भात जर कोणाची तक्रार आली तर संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. प्रत्येक मंडळाने अग्नी विरोधी उपाययोजना म्हणून वाळूच्या बादल्या आणि छोटे फायर एस्टिंग्वीशर मंडपात ठेवणे गरजेचे आहे. गणेश मंडळांनी दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग करावी व त्या ठिकाणी महिला स्वयंसेवक याशिवाय पोलिसांचे निर्भया पथक यावेळी तैनात राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सहाशे तडीपार गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे. डॉल्बी सिस्टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला साऊंड अनालायझर देण्यात आला असून त्या माध्यमातून ध्वनी मर्यादेची तपासणी केली जाणार आहे. साताऱ्यात मोठ्या आवाजाचे डॉल्बी आढळल्यास त्याचा पंचनामा करून संबंधित डॉल्बी चालकांवर खटले दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |