दहिवडी : श्रीमती सीताबाई जयसिंग गलांडे, वय 72, रा. जाशी, ता. माण, जि. सातारा. या वृध्द महिलेला त्यांच्या राहत्या झोपडी त पेटवून देऊन खून केल्याच्या घटनेने परिसर सुन्न झाला आहे. वारंवार खर्चासाठी पैशाची मागणी करणाऱ्या व शेजारील वस्तीवर राहणाऱ्या नाना गलांडे याने पैशासाठी खून केल्याची कबुली दिली असून त्याला दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जाशी येथील सीताबाई गलांडे या वृध्द महिला पतीच्या मृत्यू नंतर एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना मूलबाळ काही नसल्याने घरी कोणीच नसायचे. त्यांचे शेजारी राहणारे नाना दिगंबर गलांडे (वय 20) हा पैशासाठी त्यांना वरचेवर त्रास देत असे. पाच जानेवारी रोजी रात्री त्यांची झोपडी जाळण्यात आली. जवळपास कोणीच नसल्याने कोणालाच काही कळले नाही. दोन दिवसानंतर नातेवाईक चौकशीसाठी गेल्यावर त्यांना सीताबाई जळल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईक उत्तम हरिबा चोरमले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारी मध्ये पैशासाठी नाना गलांडे त्रास देत होता त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर संबंधित महिलेची हाडे आढळली. त्यानंतर दहिवडी पोलिसांनी आरोपी नाना याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आज त्याला दहिवडी न्यायालयात हजर केले असता 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा तपास सपोनी संतोष तासगावकर करत आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |