सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास समर्थ मंदिर ते बोगदा जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजूस असणाऱ्या चढावर एका घराच्या आडोशास बाळू शामराव चौगुले हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 980 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या तेरा बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 23 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा