सातारा : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा सातवा वर्धापनदिनी प्रतिष्ठांनच्या वतीने आयोजित केलेले सर्वच उपक्रम कौतुकास्पद असून कुपर उद्योग समूह नेहमीच प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे राहील असे गौरवउदगार कूपर उद्योग समूहाचे मुख्य मानव संसादन अधिकारी श्री नितीन देशपांडे यांनी काढले.
नगरपालिका शाळेतील गरीब व गुणवंत मुलींना सायकल वाटप, दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट ,चादर वाटप तसेच लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहातील मुलींना मिष्ठान्न, शाहू बोर्डिंग मधील मुलांना अन्नदान इत्यादी उपक्रम नितिन देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पाडले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सागर पावसे, शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
शिवसेना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक सागर पावसे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला सर्वांनी अभिवादन केले त्यानंतर प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले .सायकल वाटपानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य खुलले होते. मुलींनी व शिक्षकांनी आपल्या भाषणात प्रतिष्ठान विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास उपशहर प्रमुख अभिजीत सपकाळ, शहर संघटक अमोल इंगवले,अमोल कांबळे प्रतिष्ठानचे ऍड. विनोद निकम ,विशाल भोसले मनोहर निंबाळकर, निलेश शिंदे कुमार पोतदार, दीपक पाटील तसेच नगरपालिका शाळेतील शिक्षिका शिल्पा कांबळे, संगीता आखाडे, जयश्री जाधव, रसिका शेलार, अस्मिता सावंत, वंदना तावरे, दिपाली मोरे, संगीता घनवट, रेश्मा शेख श्री किरण चोरगे तसेच सातारा शहरातील नागरिक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगवले यांनी केले तर आभार ऍड. विनोद निकम यांनी मानले.