पंजाब : पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदीराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झाला. पण सुदैवाने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सुखबीरसिंग बादल सुवर्ण मंदिराच्या बाहेर रक्षक म्हणून काम करत होते. त्याचवेळी तिथे एका व्यक्तीने बादल यांच्यावर अचानक गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले.
सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर एका व्यक्तीने अचानक गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. ही घटना घडली तेव्हा तेथे अनेक लोक उपस्थित होते. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. नारायण सिंह चौडा असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. तो दल खालसाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सुखबीरवर हल्ला करण्यासाठी त्याने पॅन्टमधून पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला पकडले आणि गोळी अकाली दलाच्या नेत्याला लागली.
शीख धर्मगुरूंनी ‘धार्मिक शिक्षा दिल्यानंतर अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी काल सुवर्ण मंदिराबाहेर ‘सेवादार’ म्हणून काम केले. आज त्यांच्या शिक्षेचा दुसरा दिवस होता, आजही ते मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपाल म्हणून एका हातात भाला धरून, निळा ‘सेवादार’ गणवेश परिधान करून सेवा देत होते. त्यांच्या त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले ते व्हिलचेअरवर बसूनच आपली सेवा देत होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत अकाली दलाचे दुसरे एक नेते सुखदेव सिंग धिंडसा यांनीही व्हीलचेअरवर बसून ‘सेवादार’ची भूमिका बजावली. धिंडसा हे वृद्ध असल्याने तेदेखील व्हीलचेअरवर होते. याशिवाय पंजाबचे माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया आणि दलजित सिंग चीमा यांनी शिक्षेचा भाग म्हणून भांडी धुतली. तसेच, सुखबीर बादल आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या गळ्यात छोटे फलक लटकवलेले होते ज्यात त्यांच्या “चुकीची” कबुली देण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर ‘सेवादार’ म्हणून काम केले.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |