कराड : कराड पोलीस अॅक्शन मोडवर असून गणेशोत्सावात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने डीजेला पूर्णत बंदी असून डाॅल्बीवर आवाजाची मर्यादा आहे. गणेश आगमनालाच कराड पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डाॅल्बी ताब्यात घेतल्या असून त्यासोबत लेझर लाईटवरही कारवाई केली आहे. त्यामुळे डाॅल्बी आणि लेझर मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कराड येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांनी डीजेला पूर्ण बंदी असून डाॅल्बीवर आवाजाची मर्यादा असल्याचे सांगितले होते. तसेच लेझर लाईटमुळे डोळ्यांना त्रास होत आहे. या बैठकीला शहरातील तसेच कराड तालुक्यातील अनेक गणेश मंडळे तसेच अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, गणेश आगमानाला काही मंडळांनी डाॅल्बी तसेच लेझर लाईट लावल्या होत्या. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक तैनात केले आहे. या पथकाने कराड शहरात 1 लेझर लाईट लावलेल्या वाहनावर तसेच 4 डाॅल्बीधारक चालक व मालक यांच्यावर कारवाई केली.
ही कारवाई कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी केली आहे.
कराड पोलिसांकडून लेझर लाईट वाहन आणि 4 डाॅल्बी जप्त
by Team Satara Today | published on : 08 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा