अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 26 April 2025


सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेळे, ता. सातारा गावच्या हद्दीत दि. 25 रोजी देवदत्त सोपान पवार (वय 43, रा. वेळे) अवैधरीत्या दारुविक्री करताना आढळून आला. पोलीस हवालदार दादा स्वामी यांनी कारवाई करुन 1 हजार 960 रुपयांची दारु जप्त केली. संशयितावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सत्यमनगर येथून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या